पत्रकारावर सासवडमध्ये जीवघेणा हल्ला

सासवड, 10 एप्रिलः (प्रतिनिधी- शरद भगत) पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जाते. या पत्रकारितेत काम करत असताना काही समाज कंटकांकडून नको त्या कारणांवरून पत्रकारांवर हल्ला करत असतात. असाच एक प्रकार पुरंदर तालुक्यातील पिसर्वे गावातील पत्रकार संदिप बनसोडे आणि त्यांच्या त्यांचे मामा दत्तात्रय वाघमारे यांच्यावर 7 एप्रिल 2023 रोजी सासवड वरून पिसार्वे गावी जाताना घडला. या घटनेत पत्रकार संदिप बनसोडे यांना लोखंडी पाईपाने मारहाण करण्यात आली आहे. या घडलेल्या प्रकाराची तक्रार संदिप बनसोडे यांनी सासवड पोलिसात केली आहे.

बानपचा बेजबाबदारपणा; लक्ष्मीनारायण नगरला दुषित पाण्याचा पाणीपुरवठा

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, पत्रकार संदिप बनसोडे हे 7 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5.15 च्या सुमारास त्यांचे मामा दत्तात्रय वाघमारे यांच्या दुचाकीवरून सासवडवरून पुरंदर तालुक्यातील पुसर्वे गावाकडे निघाले. एकतपूर येथील चौफुलाजवळ स्पीडब्रेकरवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ (एम.एच. 14 सी.एक्स. 6587) गाडीने दत्तात्रय वाघमारे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दत्तात्रय वाघमारे आणि संदिप बनसोडे हे खाली पडले. या घडलेल्या प्रकाराबाबत संदिप बनसोडे यांनी जाब विचारला असता, बापू जाधव (रा. सासवड) यांनी त्यांच्या कानशिलीत लागवली.

गुढीपाढवा आणि जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप

संदिप बनसोडे यांनी मी पत्रकार आहे, असे सांगूनही बापू जाधव यांनी आणि त्यांच्या सहा ते सात गुंडांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एका दोघांनी लोखंडी पाईप आणि सळईसारखे दिसणाऱ्या लोखंडी हत्याराने संदिप बनसोडेंना पाठीवर मारहाण केली. तेथून जात असलेले ॲड. सचिन कदम यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बापू जाधव आणि इतर गुंडांनी संदिप बनसोडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

संदिप बनसोडे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी बापू जाधव आणि इतर जणांवर सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार मुजावर करीत आहे.

2 Comments on “पत्रकारावर सासवडमध्ये जीवघेणा हल्ला”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *