दरम्यान, 28 जुलै रोजी सायंकाळी, गुजरात पासिंग असलेला टँकर मोरगावकडून निराकडे जाताना चालकाचा अचानक ताबा सुटला. यामुळे भरधाव टँकर हा निरा मार्गे मोरगावकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराच्या बाजूने पलटी झाली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या अपघातातील जखमींवर मोरगाव येथील मयुरेश्वर आयसीयु हॉस्पिलटलमध्ये उपचार सुरु आहेत.