बारामती/मुर्टी, 9 एप्रिलः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मुर्टी गावातील नीरा- मोरगाव रोडवर आज, मंगळवारी (दि.9 एप्रिल) सकाळी 8.30 च्या सुमारास ट्रॅक्टर व कारचा भीषण अपघात झाला. कारच्या वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे पाठीमागून कारची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक झाली. या अपघातात तीन व्यक्ती गंभीर जखमी झालेल्या आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
मात्र सदर रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हे अपघात होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बालगुडे यांनी केला आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा रस्त्याच्या कडेच्या साईट पट्ट्या व पांढरे पट्टे हे अजूनही मारण्यात आलेले नाहीत. दिशादर्शक फलक नाहीत, स्पीड कंट्रोल करण्यासाठी रंबल देखील नाहीत. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी विनंती बाळासाहेब बालगुडे यांनी केलेली आहे. मूर्टी ते मोरगाव या पाच किलोमीटर अंतरामध्ये साईटला पांढरे पट्टे नाहीत. कॉन्ट्रॅक्टर खत्री यांनी केलेल्या सहा किलोमीटर अंतरामध्ये कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक व गतिरोधक वरती रिफ्लेक्टर लावलेले नसल्याचे बाळासाहेब बालगुडे यांनी सांगितले.