बारामती, 28 ऑक्टोबरः बारामती -मोरगाव रस्त्यावर गुरुवारी, 27 ऑक्टोबर 2022 रोजी रात्रीच्या सुमारास चारचाकी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील माय लेकरासह रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या जिल्हा मार्ग क्रमांक 65 वर काऱ्हाटी नजीक फोंडवाडा येथे भरधाव चारचाकी कारने दुचाकी वरील दोन व्यक्ती व एक पादचारी यांना जोरदार ठोस दिली. या भीषण झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पीक विमा योजनेत सहभाग घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्कुटी या दुचाकीवरुन कऱ्हावागज येथील राऊत कुटुंबातील आई व मुलगा असे दोन जण मोरगाव- बारामती रस्त्याने कऱ्हावागज कडे चालले होते. तर फोंडवाडा येथील दशरथ पिसाळ (वय 62) वर्षे हे रस्त्याच्या बाजुने फोंडवाडाच्या दिशेने जात होते. त्याच दरम्यान बारामती बाजुने भरधाव वेगाने चारचाकी कार आली. या गाडीने तिघांना जोरदार ठोस दिली. यामध्ये तीन जण जागीच मृत्यू पावले आहेत.
घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशीरापर्यंत घटनेचा पंचनामा करून गुन्हा नोंदच्या कार्यवाहीचे काम सुरु होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
2 Comments on “बारामतीत भीषण अपघात; माय लेकरासह पादचारी ठार”