शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बॉम्ब धमकी

मुंबई, 30 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारच्या वतीने नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. तसेच सर्व जिल्ह्यांच्या पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करा यासंदर्भातील निर्देश मुख्यमंत्र्यांनी महसूल आणि कृषी विभागाला दिले आहेत.

महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला


दरम्यान, गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेती आणि फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील 1 लाख हेक्टर कृषी क्षेत्राचे नुकसान झाले असल्याची माहिती या बैठकीतून देण्यात आली आहे. तसेच या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून त्यांना 3 हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली आहे. त्यासाठी महसूल आणि कृषी विभागाने तात्काळ सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करून ते एकत्रित सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

तसेच यासंदर्भात प्रशासनाने युद्धपातळीवर काम पूर्ण करावे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून 33 टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाल्याप्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश प्रशासनाला दिले होते. याची माहिती देखील या बैठकीत देण्यात आली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी वेळेत सादर करावेत आणि या प्रस्तावावर सबंधित विभागाने तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश या बैठकीतून देण्यात आले आहेत.

या व्यतिरिक्त सदरच्या बैठकीत आणखी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यात 478 शाळांचा समावेश करण्यात आला आहे.

भविष्यात सर्व महिला सैनिक देशाला नव्या उंचीवर घेऊन जातील – राष्ट्रपती

तसेच मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढवून 500 कोटी इतकी करण्याच्या प्रस्तावाला या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय, औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायिक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित सेवानिवृत्ती वेतन व अन्य बाबी लागू करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सोबतच झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.

तसेच अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक, सावळीविहीर खुर्द आणि कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील शेती महामंडळाची जमीन नवीन औद्योगिक वसाहतीसाठी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय, शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग 1 जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्यासंदर्भातील निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.

One Comment on “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *