बारामती, 3 मार्चः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मुर्टी गावात 2 मार्च 2023 रोजी अटल भूजल योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. या प्रसंगी मुर्टी ग्रामपंचायतीचे उपसरपंच किरण जगदाळे, मोहन जगदाळे, गणेश बालगुडे महाराज, मुर्टी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे, बाळासाहेब बालगुडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला मुर्टी ग्रामपंचायत सदस्य अश्विनी बालगुडे या आवर्जून उपस्थित होत्या. या प्रशिक्षणात पाणी व्यवस्थापन करणे व भूजल पातळी आराखडा तयार करणे आदी माहिती देण्यात आली. प्रशिक्षण हे अत्यंत खेळे मेळीन पार पडले. प्रशिक्षणाला शिंदे सर व शिंदे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
बारामतीत दिवसाढवळ्या महिलेवर बलात्कार; आरोपी मोकाट
2 Comments on “मुर्टी गावात अटल भूजल योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण संपन्न”