फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे – सुप्रिया सुळे

पुणे, 22 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 20) पत्रकार परिषद घेत कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर आरोप केले होते. त्यानंतर या कंत्राटी भरती वरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यामुळे सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

गरबा खेळताना 24 तासांत 10 मृत्यूची नोंद

आता या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला तेंव्हा शरद पवार हे मंत्रिमंडळात नव्हते. कंत्राटी भरतीत शरद पवारांचे काय काम होते? तेंव्हाच्या सरकारमध्ये जे लोक मंत्री म्हणून होते तेच लोक आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या बाबत गैरसमज पसरवला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

35 हजार कोटींचा अखर्चित निधी विकासकामांसाठी वापरणार!

तसेच जो व्यक्ती मुख्यमंत्री पदाचा दावेदार होता. त्याला उपमुख्यमंत्री व्हावे लागले. त्यामुळे मला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. दरम्यान, कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर हल्लाबोल होता. “कंत्राटी भरतीचे हे पाप काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातील असून त्यांचे हे पाप आमच्या माथी घेणार नाही. कंत्राटी भरतीचा सर्वात पहिला निर्णय 2003 मध्ये झाला. हा निर्णय काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतला होता. त्यानंतर आलेल्या काँग्रेस सरकारने वेळोवेळी कंत्राटी भरती काढली होती. तसेच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांच्या आशीर्वादाने त्यांनीही कंत्राटीचा निर्णय घेतला गेला होता.” असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. 

One Comment on “फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे – सुप्रिया सुळे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *