तळवडे, 08 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पिंपरी चिंचवडच्या तळवडे भागातील फायर कँडल तयार करणाऱ्या एका कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तर या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सध्या त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. तर या आगीत आणखी काही जण अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान या लोकांचा सध्या शोध घेत आहेत. सध्या याठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
https://x.com/ANI/status/1733083513048727901?s=20
पिंपरी चिंचवडच्या तळवडे परिसरात वाढदिवसाच्या मेणबत्त्या बनवण्याचा (फायर कँडल) कारखाना आहे. या कारखान्याला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यानंतर काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत 6 महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार जखमी झाले आहेत. सध्या जखमी कामगारांना वायसीएम आणि ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.
https://x.com/PTI_News/status/1733086879896014880?s=20
दरम्यान, वाढदिवसाच्या मेणबत्त्या बनवण्याच्या या कारखान्यात विनापरवाना फटाके बनवण्याचे काम सुरू होते, असे म्हटले जात आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तर या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा तपास सध्या पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे. तसेच यासंदर्भात या गोदामाचा मालक आणि व्यवस्थापक यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
https://twitter.com/PTI_News/status/1733084744647094683?s=19
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1733096076079669447?s=19
या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि दु:खद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या उपचाराची काळजी घेतली जात आहे. पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती सर्व मदत दिली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.