वारीसाठी नगर परिषदेकडून 800 सिट मोबाईल शौचालयाची सोय

बारामती, 27 जूनः बारामती नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात संत तुकाराम महाराज पालखी उद्या 28 जून (मंगळवार) रोजी आगमन होत आहे. या पालखी सोहळ्यासाठी बारामती नगर परिषदेने जय्यत तयारी केल्याचे सध्या कार्यक्षेत्रात चित्र आहे. नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी पालिकेकडून तब्बल 800 सिट मोबाईल शौचालय बसविण्यात येत आहेत.

सदर 800 सिट मोबाईल शौचालय हे निर्मल वारी अंतर्गत शहरात बसविण्यात येत आहे. शहरात मुक्कामी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी नगर परिषदेकडून विविध सोय देखील करण्यात येत आहे. यात पाण्याच्या सोयी पासून, रस्ते डांबरीकरण करून पॅचवर्कची कामे, रस्ते साफसफाईपासून पालखीला अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याची कामी, विद्युत व्यवस्था आदी कामे करण्यात आली आहेत. तसेच पालखीच्या विसाव्यासाठी तसेच भाविकांच्या दर्शनांसाठीची व्यवस्थाही उत्तम करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *