मुंबई, 9 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास 9 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली होती. मात्र आता बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यानूसार बारावीच्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 20 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची माहिती शिक्षण मंडळाने दिली. तर याच्या आधी विद्यार्थ्यांना 9 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येणार होते. त्यामुळे या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार ही अफवा – मुख्यमंत्री शिंदे
तर परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच अर्ज भरावेत, असे शिक्षण मंडळाने म्हटले आहे. तसेच हे अर्ज ऑनलाईन स्वरूपात असल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरून भरता येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नाशिक अमरावती आणि कोकण या 9 विभागीय मंडळाचा समावेश आहे.
बेकायदा फटका विक्री, साठवणूक व हताळणे विरुद्ध कारवाई कोण करणार?
दरम्यान बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 19 मार्च 2024 या कालावधीत पार पडणार आहे. तसेच बारावीच्या माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन होणार असून, ती 20 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. त्याचप्रमाणे इयत्ता बारावीची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा 2 ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घेतली जाणार आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक शिक्षण मंडळाने याआधीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाला लागण्याची आवश्यकता आहे.
One Comment on “बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ”