पुणे, 29 ऑगस्टः पुण्यासह पिंपरी-चिंचवड, मुंबई, अमरावती, नाशिक, नागपूर या विभागांमधील केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना 2 ऐवजी 9 सप्टेंबरपर्यंत या फेरीतून प्रवेश घेता येणार आहे. हा निर्णय गणेशोत्सवातील सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. या संदर्भातील सुधारीत वेळापत्रकही जाहीर केले आहे.
निरा डावा अस्तरीकरण विरोधात मेळाव्याचे आयोजन
यापूर्वीच विशेष फेरीसंदर्भात माध्यमिक विभागाने एक वेळापत्रक जाहीर केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना 27 ऑगस्टपर्यंत नव्याने अर्ज भरण्याची आणि अर्जाच्या भाग दोनमध्ये बदल करण्याची संधी होती. सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 29 ऑगस्टपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्जांमध्ये बदल करता येणार आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 30 ऑगस्टला कॉलेजचे कट ऑफ आणि प्रवेश जाहीर केले जाणार होते.
अखेर ट्विन टॉवर झाला जमीनदोस्त
आता 2 सप्टेंबरला कट ऑफ जाहीर होतील. 9 सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येतील. गणेशोत्सवामुळे सुट्ट्यांचे दिवस आहेत. त्यामुळे केवळ दोन दिवस प्रवेशासाठी दिले असते तर विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले असते. आता 6 दिवस विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. ‘विद्यार्थ्यांनी वेळ न घालवता तातडीने प्रवेश घ्यावेत, ‘ असे आवाहन माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी केले आहे.
सध्या अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थी संपूर्ण फी भरून प्रवेश निश्चित करतात. मात्र काही विद्यार्थी मिळालेला प्रवेश काही कारणास्तव रद्द होतात. असे प्रवेश रद्द करताना विद्यार्थ्यांनी जर संबंधित महाविद्यालयातील फी भरलेली असेल तर प्रवेश रद्द करताना केवळ 200 रुपये शुल्क कमी करून उर्वरित संपूर्ण फी विद्यार्थ्याला परत करावी. महाविद्यालयाच्या फी व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येऊ नये. तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना कोणत्याही प्रकारचे साहित्य महाविद्यालयातून खरेदी करण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना उपसंचालक कार्यालयाने दिल्या आहेत.