महामार्गावर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

इंदापूर, 29 नोव्हेंबरः पुणे-सोलापूर महामार्गावर रोड लगत पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीत लिफ्ट देण्याच्या बहाणा करून प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला आहे. सदर गुन्ह्यात दोघांजणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, पुणे ग्रामीण इंदापूर पोलीस स्टेशन आणि भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत 12 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री पुणे सोलापूर महामार्ग रोड लगत पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीत लिफ्ट दिली जात असे. काही अंतर पुढे गेल्यानंतर प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले जात असे. त्यानंतर त्यांना तिथेच सोडून टोळी पळून जात असे. सदर घटनेबाबत इंदापूर पोलीस स्टेशन आणि भिगवण पोलीस स्टेशन येथे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. सदर दोन्ही गुन्ह्यात तब्बल 69 हजार 700 रुपयांच्या मुद्देमालाची जबरी चोरी झाली आहे.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधीकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पुणे ग्रामीण येथे वेगवेगळ्या टिम्स तयार करत गुन्हा उडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी सदरच्या गुन्ह्याच्या तपासासाठी तपास पथक तयार केली. या पथकांकडून संशयित संतोष धनगर (वय 27, रा. गोपाल वस्ती बेलगाव, ता. गेवराई, जि. बीड) यास ताब्यात घेतले. लुटमारी संदर्भात तपास केले असता त्याच्याकडून चोरी गेलेला माल मिळून आला. संतोषची आणखीन चौकशी केली असता त्याने आणि त्याचे साथीदार ऋषिकेश गुंड (रा. बेलगाव, ता. गेवराई, जि. बीड), असाफ शेख (रोहतवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) आणि अतुल उर्फ डॉक्टर वाघमारे (रा. शिवाजीनगर, बीड) यांनी दोन्ही गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर संशयित आरोपी संतोष धनगर आणि ऋषिकेश गुंड याला पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे विभागात बहुविद्याशाखीय केंद्र कार्यान्वित होणार

तर उर्वरीत संशयित आरोपी असाफ शेख आणि अतुल उर्फ डॉक्टर वाघमारे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी पोलीस स्टेशन येथील वेगळ्या गुन्ह्यात जेलमध्ये आहेत. तसेच या संशयित आरोपींनी करमाळा आणि फलटण तालुक्यातही अशाच प्रकारे लुटमारी केल्याचे सांगितले. या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरु आहे.

सदर कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस सबइन्स्पेक्टर अमित सिदपाटील, अभिजीत सावंत, सहाय्यक फौजदार बाळासाहेब कारंड, रविराज कोकरे, प्रकाश वाघमारे, हनुमंत पासलकर, काशीनाथ राजापुरे, पोलीस हवालदार राजू मोमीन, रामदास बाबर, विक्रमसिंग तापकीर, अजित भुजबळ, स्वप्निल अहिवळे, अभिजीत एकशिंगे, पो. कॉ. निलेश सुपेकर यांनी केली आहे.

बारामतीत सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू!

One Comment on “महामार्गावर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *