फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, लाखो रुपयांचे फटाके जळून खाक

बार्शी, 21 जून: (विश्वजीत खाटमोडे) सोलापूर जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (दि.21) सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तालुक्यातील घारी गावाजवळील फटाक्याच्या कारखान्यात घडली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली. परंतु, या आगीमुळे कारखान्यातील 40 लाख रुपयांचे फटाके जळून खाक झाले आहेत. याची माहिती पांगरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर यांनी माध्यमांना दिली आहे.

https://youtu.be/kPGBWlETphY?si=9Sws3hueUIgmT5_d

स्फोटाची तीव्रता खूप जास्त

दरम्यान, बार्शी तालुक्यातील कुसळंब गावापासून 6 किलोमीटर अंतरावर घारी हे गाव आहे. या गावापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात आज सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे आग लागून स्फोट झाला. त्यानंतर ही आग वाढत गेल्यामुळे या कारखान्यातील लाखो रुपयांचे फटाके जळून नष्ट झाले. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, त्याचा आवाज काही किलोमीटरपर्यंत ऐकू गेला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

https://youtu.be/prMK7cF3MSE?si=T0Kw_QCUM17eDnLL

आगीवर नियंत्रण

या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी अग्निशमन दलाला याठिकाणी पाचारण केले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी ही आग विझविली. या दुर्घटनेमध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही. सध्या येथील परिस्थितीवर पोलिसांचे लक्ष असून, या दुर्घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर यांनी यावेळी दिली.

वटपौर्णिमा असल्याने जीवितहानी टळली

तत्पूर्वी, वेलकम फायर वर्क्स असे या कारखान्याचे नाव असून, हा फटाक्यांचा कारखाना घारी गावच्या शिवारातील युन्नूस मुसाभाई मुलाणी यांच्या मालकीचा आहे. या कारखान्यात दररोज घारी गावासह आसपासच्या परिसरातील जवळपास 15 महिला मजूर काम करत असतात. परंतु, आज वटपोर्णिमा तसेच पावसाचे वातावरण असल्यामुळे हा कारखाना गेल्या 2 दिवसांपासून बंद होता. सुदैवाने हा कारखाना बंद आल्यामुळे जीवितहानी टळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *