राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; 39 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नागपूर, 15 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होणार आहे. त्याआधी नागपूर येथे आज (दि.15) महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. याप्रसंगी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री पदाचा समावेश आहे. या सोहळ्यात भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नागपूर येथील राजभवनावर पार पडलेल्या या समारंभात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान, या आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली असली, तरीही मात्र त्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. लवकरच हे खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात कोणाला कोणते खाते मिळते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://x.com/CMOMaharashtra/status/1868253368365588601?t=A1aTJ517doBCpe9i7LMqVQ&s=19

भाजपच्या 19 आमदारांनी घेतली शपथ

भारतीय जनता पक्षाच्या 19 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे या आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर आकाश फुंडकर, माधूरी मिसाळ, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

शिवसेनेच्या 11 आमदारांनी घेतली शपथ

याबरोबरच शिवसेनेच्या 11 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये गुलाबराव पाटील, दादा भूसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर या नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिवसेनेच्या अशिष जैस्वाल आणि योगेश कदम यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी घेतली शपथ

यावेळी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील या आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईक यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *