तुळजापूर, 06 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे दागिने गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट, 12 पदराच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्र, 4 तोळे सोन्याच्या पादुका, माणिक मोती आणि नेत्रजोड हे दागिने गहाळ झाले आहेत. याशिवाय, तुळजाभवानी मातेला भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या शुद्धतेत 50 टक्के तूट आढळून आली. तर या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण तुळजाभवानी मंदिर संस्थान ने आणलेल्या सोने व चांदी शुध्दता तपासणी मशीनमुळे समोर आले आहे.
पंतप्रधान मोदींनी मिचॉन्ग चक्रीवादळात झालेल्या मृत्यूंबद्दल शोक व्यक्त केला
दरम्यान, तुळजाभवानी मातेच्या प्राचीन दागिन्यांची तपासणीसाठी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती नेमली होती. या समितीने तपासणी मशीनच्या साहाय्याने ह्या दागिन्यांची मोजदाद केली. त्यावेळी यांतील काही दागिने गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भातील अहवाल या समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
मराठा आरक्षणाला क्युरेटिव्ह पिटीशनचा फायदा होणार नाही – गुणरत्न सदावर्ते
दरम्यान, तुळजाभवानी मातेचा 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट गहाळ झाल्यानंतर त्याजागी दुसरा बनावट मुकुट ठेवण्यात आला आहे. तसेच पुरातन सोन्याच्या पादुकांऐवजी तांब्याच्या पादुका ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तर ही चोरी लपविण्याच्या उद्देशाने या दागिन्यांची अदला बदल करण्यात आली आहे. त्यामुळे ही चोरी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
One Comment on “तुळजाभवानी देवीचे दागिने गहाळ झाल्याने खळबळ”