बारामतीत विवाहित महिलेच्या हत्येने खळबळ!

बारामती, 4 फेब्रुवारीः (प्रतिनिधी- साजन पवार/सागर कबीर) बारामती शहरात आज, रविवारी सायंकाळच्या सुमारास एका नामांकित लॉजवर एक महिलेचा रक्ताने माखलेला विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह पाहून सदर महिलेची हत्या झाल्याचे पोलिसांनी प्रथमदर्शनी सांगितले. सदर महिलेची हत्येवरून विविध तर्कवितर्क काढण्यात आले. मात्र पुढील तपासात धक्कादायक सत्य समोर आले.

चलो दिल्ली! पत्रकारांची वरात दिल्लीच्या दारात

सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. मृत महिला ही दौंड तालुक्यातील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. तसेच मृत महिला ही तिच्या पतीसोबत संबंधित लॉजवर आली होती. हत्या केल्यानंतर मृत महिलेच्या पतीने त्या ठिकाणाहून पळ काढला. मात्र सदर हत्या का झाली? कोणत्या कारणातून करण्यात आली? हे अद्यापही समजू शकले नाही. सदर घटनेचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.

दुसरी कसोटी: भारताकडे 171 धावांची आघाडी; दुसऱ्या दिवसाअखेर भारत बिनबाद 28

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *