बारावीत बायोलॉजी विषय नसला तरीही डॉक्टर बनता येणार!

दिल्ली, 24 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) डॉक्टर होण्यासाठी बायोलॉजी हा विषय महत्त्वाचा मानला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांना अकरावीतच बायोलॉजी हा विषय निवडावा लागतो. तर बऱ्याच वेळा विद्यार्थी बारावीची परीक्षा फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटीक्स हे विषय घेऊन पास होत होते. त्या विद्यार्थ्यांना नंतर त्यांची डॉक्टर बनण्याची इच्छा होते. मात्र त्यांनी बायोलॉजी विषय घेतला नसल्यामुळे त्यांना डॉक्टर किंवा डॉक्टरच्या क्षेत्रात जाता येत नव्हते. मात्र आता नवीन नियमानुसार, 11 वी आणि 12 वीत बायोलॉजी विषय नसला तरीही विद्यार्थी NEET ची परीक्षा देऊ शकतात. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीत स्वतंत्रपणे बायोलॉजी किंवा बायोटेक्नोलॉजीची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.

इंदोरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा

विद्यार्थ्यांना आता डॉक्टर बनण्यासाठी बारावीत बायोलॉजी विषयाचा अभ्यास करावा लागणार नाही. यासाठी नॅशनल मेडिकल कौन्सिल अर्थात NMC ने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार, इयत्ता 11वी आणि 12 वीत गणित विषय शिकणाऱ्या मुलांनाही भविष्यात वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याची संधी मिळणार आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 11 वी आणि 12 वीत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटीक्स हे विषय घेतले असतील, त्यांना सुद्धा आता डॉक्टर बनता येणार आहे. तर हा निर्णय 2024 या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.

डीपफेक संदर्भात केंद्र सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत

NEET परीक्षेत बसण्यासाठी पूर्वीच्या पात्रतेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अनिवार्य विषय म्हणून फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी यांचा अभ्यास करणे आवश्यक होते. मात्र राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने NEET UG च्या नियमांत बदल केला आहे. त्यानूसार आता बॉयोलॉजी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीत अतिरिक्त विषय म्हणून बायोलॉजी किंवा बायोटेक्नोलॉजीची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. तसेच बॉयोलॉजी विषय नसणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील आता मेडिकलच्या अभ्यासक्रमासाठी परदेशात जाता येणार आहे.

One Comment on “बारावीत बायोलॉजी विषय नसला तरीही डॉक्टर बनता येणार!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *