बारामती जिंकण्याआधीच भाजपमध्ये अंतर्गत कलह

बारामती, 14 जानेवारी: भारतीय जनता पार्टी बारामती मिशन अंतर्गत चाललेल्या प्रक्रियेला बारामती तालुक्यातच खिळ बसले असून आज, 14 जानेवारी 2023 रोजी आमदार प्रा. राम शिंदे (प्रभारी बारामती लोकसभा मतदारसंघ) यांच्या उपस्थितीत निवडणूक पूर्वतयारी बैठक आयोजित केली होती. 

सदर बैठक सुरू होण्यापूर्वी कार्यकर्ते मानपान व पद संधी वरून एकमेकात भिडले. हा सगळा गोंधळ कार्यालया बाहेर चालू असताना, अतिशय खालच्या पातळीवर सदरचा वाद गेल्याचे समजते.

जय मल्हार क्रांती संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी मदने यांची निवड

ध्यक्षांकडून शहर व तालुक्यात काम उभे राहत नाही यावरून कार्यकर्त्यांच्यात घामासान झाले .प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही ,नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही, असे आरोप प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवर करण्यात आले.

सदरची घटना वाऱ्यासारखी बारामतीत पसरली असून अजितदादा फॅन क्लब या नावाने असणाऱ्या समाज माध्यमावर सदरची घटना प्रसिद्ध करण्यात आली आहे. बारामती जिंकण्या आधीच परस्पर अंतर्गत कलहाने भारतीय जनता पार्टीचा पराभव होणार अशी चर्चा बारामती मतदारांमध्ये आहे.

बारामती शहरावर पाणी संक्रांत! दिवसाआड होणार पाणी पुरवठा

 

3 Comments on “बारामती जिंकण्याआधीच भाजपमध्ये अंतर्गत कलह”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *