कुपवाडा, 7 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या 41 राष्ट्रीय रायफल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी भारतीय सैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. या कार्यक्रमाला जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट
कुपवाडा येथे होत असलेल्या या कार्यक्रमात वीर पत्नींना सन्मानित करण्यात येणार असून वीर शहीद कर्नल संतोष महाडिक यांना अभिवादन केले जाणार आहे. तर भारत-पाक सीमेवर बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पहिलाच अश्वारूढ पुतळा आहे. दरम्यान सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार तसेच महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यातून ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात आला आहे.
कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा साडे 10 फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि 7 x 3 या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात आला आहे. तसेच या पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे. तर छत्रपतींचा हा पुतळा नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनविलेला आहे. हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दीर्घकाळ टिकून राहील, अशा पद्धतीने बनविण्यात आला आहे.
बांगलादेश-श्रीलंका सामन्यात वाद; शाकीबच्या कृतीवर प्रश्न उपस्थित
या अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने करण्यात आले आहे. तत्पूर्वी या पुतळ्याचे भूमिपूजन 20 मार्च 2023 रोजी पार पडले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या 5 किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणण्यात आले होते.
One Comment on “भारत-पाक सीमेवरील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण”