बारामतीत जागतिक एड्स दिनानिमित्त समानता संकल्पना

बारामती, 2 डिसेंबरः बारामती येथील सिल्वर ज्युबिली रुग्णालय येथे 1 डिसेंबर 2022 रोजी जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन बारामती एआरटी (ART) सेंटर आणि सिल्वर ज्युबिली रुग्णालयातर्फे करण्यात आले. यंदाच्या एड्स दिनाच्या ‘समानता’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाच्या सुरुवातीला नागरिकांना एचआयव्ही (HIV) संक्रमित व्यक्तींना समानतेची वागणूक देण्यासंदर्भात शपथ देण्यात आली. तसेच शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली.

एड्स दिनानिमित्त इन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियातर्फे गरजू रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधे देणगी स्वरूपात देण्यात आली. ती सिल्वर ज्युबिली रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस यांनी स्वीकारली, तसेच फार्मा असोसिएशनतर्फे रुग्णांसाठी वापरण्यासाठी आवश्यक ग्रीन बुक्स व टोकन भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमासाठी बारामतीच्या माजी नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे व इन्व्हायर्नमेंटल फोरमचे अनेक सदस्य उपस्थित होते.

बारामतीत ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

एआरटी सेंटर मार्फत येत्या आठवडाभर एड्स च्या जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत., त्यात महाविद्यालयात व्याख्यान, तसेच रुग्णांसाठी विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे शिबिर, लहान मुलांसाठी सामूहिक वाढदिवस साजरीकरण व पौगंडावस्थेतील मुलामुलींसाठी विशेष करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा यांचा समावेश आहे. येत्या महिन्याभरात अधिकाधिक व्यक्तींच्या एच आय व्ही तपासणीसाठी प्रेरित करण्यासाठी शहरातील आय एम ए, मेडिकोज गिल्ड, निमा व होमिओपॅथिक असोसिएशन बारामती यांना रुग्ण सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये पाठविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय वायुसेनेचे चेतक हेलिकॉप्टरचे बारामतीत इमर्जन्सी लँडिंग!

प्रस्तावना करताना बारामती एआरटी सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवती संत यांनी एचआयव्हीच्या सद्यःस्थितीचा आढावा घेतला. तसेच बारामती सेंटर मार्फत रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या सेवांची माहिती दिली. कार्यक्रमाचे निवेदन टीबी अधिकारी मोहिते यांनी केले तर एआरटीचे समुपदेशक अजित शेंडे यांनी आभार व्यक्त केले.

2 Comments on “बारामतीत जागतिक एड्स दिनानिमित्त समानता संकल्पना”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *