बारामती, 20 सप्टेंबरः भटक्या जनावरांच्या त्रासाला वैतागून बारामती नगर परिषदेसमोर नागरीकांनी काल, सोमवारी 19 सप्टेंबर 2022 रोजी आंदोलन केले. या आंदोलनात बानपचे आरोग्य अधिकारी आदित्य बनकर यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी करण्यात आली. बारामतीत भटक्या जनावरांचे साम्राज्य झाले असून याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
डेंग्यूने घेतला बारामतीमधील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा बळी
सध्या बारामती नगर परिषदेकडे भटकी जनावरे डांबून ठेवण्यासाठी कुठलीही सुविधा नाही. त्यामुळे विकसित बारामतीमध्ये बारामतीकरांची नाचक्की होत आहे. भटकी जनावरे धरणाऱ्या बानपच्या ठेकेदाराचे नाव डॉ. डी जी. कांबळे (बारामती पेट्स क्लिनिक) असून त्याच्याकडे कुठलीही साधन सामग्री नाही. त्यामुळे मनुष्यबळ, तांत्रिक साधन नसल्याने सदर ठेका दिल्याच कसा? हा प्रश्न निर्माण होतोय.
जनावरे पकडले किती? सोडले किती? ते कुठे सोडले? त्यांचं कुठल्याही रेकॉर्ड ठेकेदाराकडून घेतले नाही. तसेच ठेकेदाराची मुदत संपल्या चर्चा प्रशासनामध्ये सुरु आहे. भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे बारामतीतील सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये रोज दहा लोकं इंजेक्शन घेण्यासाठी दाखल होत आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त बारामती नगरपालिका कधी करणार? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
तर दुसरीकडे राज्या स्वाईन फ्लूची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. डुकरांमुळे स्वाईन फ्लूचा प्रसार होत आहे. बारामती नगर परिषदेच्या हद्दीदेखील डुकरांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे बानपला बारामती रोगमुक्त करायची आहे? की रोग युक्त करायची आहे? असा जाब बारामतीकर निष्क्रिय आरोग्य अधिकारी आदित्य बनकर यांना विचारत आहे.