भारतीय वायुसेनेचे चेतक हेलिकॉप्टरचे बारामतीत इमर्जन्सी लँडिंग!

बारामती, 1 डिसेंबरः भारतीय वायुसेनेच्या चेतक हेलिकॉप्टरने तांत्रिक समस्येमुळे बारामती तालुक्यातील खांडज- निरावागज रस्त्याच्या उजव्या बाजूस असणाऱ्या हनुमंत आटोळे यांच्या मोकळ्या शेतात आज, गुरुवारी 1 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास इमर्जन्सीने लँडिंग केले. भारतीय वायुसेनेचे चेतक हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इंडियन एअर फोर्सच्या महिला पायलट गायत्री यांना ही इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. सदर हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह चार व्यक्ती असल्याची माहिती बारामती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. आयएएफ(IAF)ने सांगितले की, चालक दल आणि विमान सुरक्षित होते. बिघाड दुरुस्त झाल्यानंतर चेतक हेलिकॉप्टर पुन्हा आकाशात झेपावले. या संदर्भातील एक व्हिडीओ ‘भारतीय नायक’ जवळ आला आहे.

बारामतीत ‘या’ निवडणुका होणार चुरशीची!

बारामती तालुक्यातील खांडज गावात अचानकपणे हेलिकॉप्टरचे लँडिंग झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या पार्श्वभूमीवर माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत सदर हेलिकॉप्टरसह महिला पायलट आणि त्यांच्या साथीदारांना सुरक्षा पुरवली. घटनेची माहिती मिळताच बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे घटनास्थळी दाखल होत घडलेल्या घटनेचा आढावा घेतला. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी, 25 जुलै 2022 रोजी इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे बारामतीमधील कार्व्हर एव्हिएशनचे एक विमान तांत्रिक बिघाडामुळे अशीच लँडिंग करावी लागली होती.

चेतक हेलिकॉप्टर हे दोन टन क्लासचे हेलिकॉप्टर आहे आणि ते आर्टॉस्ट- III B टर्बोशाफ्ट इंजिनद्वारे समर्थित आहे. हेलिकॉप्टर प्रवास, मालवाहू आणि साहित्य वाहतूक, अपघातग्रस्त निर्वासन, शोध आणि बचाव (SAR), हवाई सर्वेक्षण आणि गस्त, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, ऑफ-शोअर ऑपरेशन्स आणि अंडरस्लंग ऑपरेशन्ससाठी योग्य आहे.

उसाने भरलेला ट्रॅक्टर शिरला मंदिरात!

पुणे ग्रामीण पोलिसांच्या बारामती विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे म्हणाले, “सकाळी 10.30 च्या सुमारास घटनेची माहिती मिळाल्यानंतर, सशस्त्र कर्मचार्‍यांसह स्थानिक पोलिसांचे एक पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आणि संपर्क प्रस्थापित करण्यात आला.

One Comment on “भारतीय वायुसेनेचे चेतक हेलिकॉप्टरचे बारामतीत इमर्जन्सी लँडिंग!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *