बारामती, 21 सप्टेंबरः बारामतीत दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने 23 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता नगर परिषदेसमोर आंदोलन होणार आहे. सदर आंदोलन हे बारामती शहर आणि तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.
बानपचा दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला मागे
बारामती शहरासह तालुक्यातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बारामती नगर परिषदेसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे.
बारामतीत भटक्या जनावरांचे साम्राज्य!
तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संस्था बारामती तालुक्याच्या वतीने पंचायत समिती या ठिकाणी विविध मागण्यांचे पत्र देण्यात येणार आहे. तसेच त्याच सह्यांची नोंद मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर आंदोलनाचे फ्लेक्स बारामतीतील चौका चौकात लावण्यात आले आहे.