ऑल इंडिया संपादक संघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी स्वप्निल कांबळे यांची निवड

बारामती, 6 डिसेंबरः ऑल इंडिया संपादक संघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी साप्ताहिक बारामती समाचार वृत्तपत्राचे संपादक स्वप्निल कांबळे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या अगोदर त्यांनी पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. त्याच प्रमाणिक कामाची दखल घेत संस्थापक अध्यक्ष करण बौद्ध यांनी ही नियुक्ती केली आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत सुट्टी जाहीर

गेली आठ – नऊ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक पत्रकारिता करत कायम लोकांचे प्रश्न- समस्यांची आणि अडी अडचणींची प्राथमिकता ओळखून जबाबदारीने काम करत आहे.

ऑल इंडिया संपादक संघाचे संघटन देशाच्या 10 राज्यात तर महाराष्ट्रात एकूण 21 जिल्ह्यात संघटन आहे त्या सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांना एकत्र घेऊन पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांच्या न्याय-हक्कासाठी मी काम करणार आहे.

सुनेत्रा पवार बारामतीच्या भावी खासदार? मुंबईत बॅनर झळकले

ऑल इंडिया संपादक संघाचे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी ही माझी प्राथमिकता असुन ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध राहील.

One Comment on “ऑल इंडिया संपादक संघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी स्वप्निल कांबळे यांची निवड”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *