सरपंच, नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून!- मुख्यमंत्री

मुंबई, 14 जुलैः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, 14 जुलै रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरपंच, नगराध्यक्षसाठी निवड थेट जनतेतून केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे येत्या ग्रामपंचायत आणि नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत सरपंच आणि नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडले जाणार आहेत.

तसेच या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनेक घोषणाही केल्या आहेत. त्यातील एक मोठी घोषणा म्हणजे आता पेट्रोलवर 5 रुपयांची कर कपात तर डिझेलवर 3 रुपयांची कर कपात जाहीर केली आहे. ही नवी दर कपात रात्री मध्यरात्री पासून लागू होणार आहे. या घोषणेनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *