बारामती, 14 जानेवारीः(प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील सोरटे वाडी गावात नुकतीच जय मल्हार क्रांती संघटनेची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत जय मल्हार क्रांती संघटनेच्या तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या कार्यकारिणीत लोणी भापकर गावचे उपसरपंच नंदकुमार मदने यांची जय मल्हार क्रांती संघटनेच्या बारामती तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या हस्ते देण्यात आले.
लोणी भापकरमध्ये क्रिकेट सामन्यांचे आयोजन
निवड झाल्यानंतर नंदकुमार मदने यांनी सांगितले की, बारामती तालुक्यातील सर्व बहुजन समाजातील शेवटच्या घटका पर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहीन.
यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने, मनोज मदने यासह संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बारामती शहरावर पाणी संक्रांत! दिवसाआड होणार पाणी पुरवठा
One Comment on “जय मल्हार क्रांती संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी मदने यांची निवड”