महाराष्ट्र राज्य आयटीआय कर्मचारी संघटनेच्या सचिव पदी गणेश चव्हाण यांची निवड

बारामती, 29 जानेवारीः(प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मुर्टी गावचे सुपुत्र औद्योगिक प्रशिक्षण सस्थेचे इलेक्ट्रिशियन निर्देशक गणेश चव्हाण सरांची महाराष्ट्र राज्य अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कर्मचारी संघटनेच्या सचिव पदी बिनविरोध निवड झाली आहे.

रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

गणेश चव्हाण हे औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाघापुर येथे गेल्या 20 वर्षांपासून तारतंत्र (वायरमन) या विभागात शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. या सार्थ निवडीवरून त्यांनी केलेल्या कामाची पोहच पावती मिळाली, असे त्यांच्या सहकारी शिक्षकांनी म्हटले आहे. गणेश चव्हाण सरांवर मुर्टीसह वाघापुर परिसरातून कौतुक होत आहे. अशासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न अध्यक्षांपर्यंत पोहचवून योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, असा विश्वास गणेश चव्हाण यांनी कामगारांना दिला.

 

जातिवादी प्रजासत्तक 2023

2 Comments on “महाराष्ट्र राज्य आयटीआय कर्मचारी संघटनेच्या सचिव पदी गणेश चव्हाण यांची निवड”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *