लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, दिली महत्त्वाची माहिती

दिल्ली, 03 जून: (विश्वजीत खाटमोडे) देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. देशात यंदा लोकसभेची निवडणूक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीत सात टप्प्यांत पार पडली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. तसेच त्याचे निकालही लगेचच जाहीर होणार आहेत. या मतमोजणीचे ट्रेंड आणि निकाल निवडणूक आयोगाच्या http://results.eci.gov.in या वेबसाईटवर आणि व्होटर हेल्पलाईन या ॲपवर उपलब्ध असतील. व्होटर हेल्पलाईन हे ॲप गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू करता येईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1797527383735730279?s=19

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर मतमोजणीची प्रक्रिया आणि मतमोजणीची व्यवस्था याबद्दलची सर्व माहिती दिली आहे. तसेच ही मतमोजणी शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने आज दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्तांनी मतदान केल्याबद्दल देशातील मतदारांचे आभार मानले. तसेच त्यांनी उद्याच्या मतमोजणीच्या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली. देशातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सर्व घटकांच्या सहभागाने यशस्वी झाल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी म्हटले आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1797527879334740139?s=19

निवडणूक आयुक्त काय म्हणाले?

या लोकसभा निवडणुकीत आम्ही 64 कोटी 20 लाख मतदारांच्या सहभागाने जागतिक विक्रम केला आहे. हे सर्व G7 देशांच्या मतदारांच्या 1.5 पट आणि EU 27 देशांच्या मतदारांच्या 2.5 पट आहे, असे राजीव कुमार यांनी यावेळी सांगितले. काही अपवाद वगळता देशात बहुतांश ठिकाणी लोकसभेची निवडणूक शांततेत पार पडली आहे. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, “ही त्या सार्वत्रिक निवडणुकांपैकी एक आहे ज्यात आपण हिंसाचार पाहिला नाही.” संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्णत: मजबूत आहे. हे घड्याळाच्या अचूकतेप्रमाणेच कार्य करते. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच या मतमोजणी दरम्यान पोस्टल मतपत्रिकांची मोजणी आधी सुरू होईल. आम्ही अर्ध्या तासानंतरच ईव्हीएमची मोजणी सुरू करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *