प्रियांका गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस

राजस्थान, 27 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) निवडणूक आयोगाने काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रियांका गांधी यांनी राजस्थान मधील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका मंदिर भेटी संदर्भात वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. तर या नोटिशीला 30 ऑक्टोंबर पर्यंत उत्तर द्यावे, असे निवडणूक आयोगाने प्रियांका गांधी यांना सांगितले आहे.

तत्पूर्वी, देशातील 5 राज्यांमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तर राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून या निवडणुकीचा जोरदार प्रचार केला जात आहे. याच निवडणुकीच्या प्रचारसभेत प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयी हे वक्तव्य केले होते.

प्रलंबित प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या प्रस्तावाला अखेर मंजूरी!

यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, “तुम्ही ते पाहिले असेल. मी ते टीव्हीवर पाहिले आहे, ते खरे आहे की नाही हे माहित नाही. पण पीएम मोदी बहुधा देवनारायणजींच्या मंदिरात गेले असावेत. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या मंदिरातील दानपेटीत एक लिफाफा टाकला होता. मी टीव्हीवर पाहिले की, 6 महिन्यांनंतर, जेव्हा मी पंतप्रधान मोदींनी दान केलेला लिफाफा उघडला तेव्हा त्यात 21 रुपये सापडले. तुमच्या बाबतीत देखील हे वारंवार घडत आहे. मंचावर उभे राहून तुम्हाला अनेक लिफाफे दाखवले जात आहेत. तुम्ही हे लिफाफे जेंव्हा उघडतात तेंव्हा निवडणूक समाप्त झालेली असते.” दरम्यान, प्रियांका गांधी यांनी हे वक्तव्य राजस्थानच्या दौसा येथील प्रचारसभेत केले होते.

इंग्लंडला श्रीलंकेने हरवले! वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा चौथा पराभव

त्यानंतर, भाजपने प्रियांका गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. “प्रियांका गांधी यांनी त्यांच्या भाषणात असे वक्तव्य केल्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. प्रियांका गांधी या अशाप्रकारचे खोटे पसरवू शकत नाहीत. तसेच धार्मिक भावनांच्या आधारे निवडणूक प्रचार करता येत नाही.” असे भाजपने यावेळी म्हटले आहे. त्यामुळे प्रियांका गांधी निवडणूक आयोगाच्या या नोटिशीला उत्तर देणार का? आणि प्रियांका गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

One Comment on “प्रियांका गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *