नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या कथित वादग्रस्त भाषणांप्रकरणी निवडणूक आयोगाची भाजप आणि काँग्रेसला नोटीस

दिल्ली, 25 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. आपल्या भाषणांतून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ही नोटीस बजावली असून, यासंदर्भात भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी ह्या नोटीसीला उत्तर द्यावे, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याप्रकरणी निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांकडून 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे.

https://twitter.com/ANI/status/1783390641806082237?s=19

काँग्रेस आणि भाजपची एकमेकांविरुद्ध तक्रार

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून धर्म, जात, समाज आणि भाषेच्या आधारे लोकांमध्ये द्वेष आणि फूट पाडण्याचे काम केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात नरेंद्र मोदी यांच्या भाषणांविरोधात काँग्रेसने तक्रार केली होती. तर राहुल गांधी यांच्या भाषणांविरोधात भाजपने तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे निवडणूक आयोगाने काँग्रेस आणि भाजपला नोटिसा बजावल्या आहेत. याप्रकरणी निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 77 अंतर्गत नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या वादग्रस्त विधानांसाठी पक्षाध्यक्षांना जबाबदार धरले आहे. तसेच या प्रकरणाची दखल घेऊन आयोगाने दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांच्या नावे नोटीस बजावली आहे.

https://x.com/ANI/status/1783390644452687943

https://x.com/ANI/status/1783390646549840275

29 एप्रिलपर्यंत उत्तर द्यावे लागणार

काँग्रेस आणि भाजप पक्षाच्या अध्यक्षांनी या नोटीसीला 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. उमेदवार आणि स्टार प्रचारकांना संयमी भाषा वापरण्यास सांगणे ही राजकीय पक्षांची जबाबदारी असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. तसेच उच्च पदांवर असलेल्या लोकांच्या भाषणांचा खूप प्रभाव असतो. त्यामुळे काळजीपूर्वक बोलले पाहिजे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *