जळगाव, 05 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची अचानकपणे प्रकृती बिघडली आहे. एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर त्यांना तात्काळ जळगावातील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तेथील उपचारानंतर एकनाथ खडसे यांना आता मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली आहे.
मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांचे वय लहान, दीपक केसरकर यांचे विधान
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांना एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची बातमी कळली. त्यानंतर एकनाथ खडसे यांना मुंबईतील रुग्णालयात आणण्यासाठी तात्काळ एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार एकनाथ खडसे यांना आता मुंबईतील रुग्णालयात उपचारांसाठी आणले जाणार आहे. तर रोहिणी खडसे यांनी एअर अॅम्बुलन्ससाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता.
वर्ल्डकपमध्ये भारतासमोर आज दक्षिण आफ्रिकेचे आव्हान
एकनाथ खडसे यांना गेल्या काही दिवसांपासून बरे वाटत नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर जळगावातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष आहे. तर एकनाथ खडसे यांना आज सायंकाळी मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी आणले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच, त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती. तर एकनाथ खडसे यांच्यासोबत सध्या त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या रुग्णालयात आहेत.
One Comment on “एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका”