मुंबई, 25 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) दसऱ्याच्या निमित्ताने मुंबईत (दि.24) ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. यावेळी मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या दसरा मेळाव्याच्या सभेसाठी दोन्ही गटांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या सभांच्या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मी राजकारणातून कायमचा बाजूला जातोय- निलेश राणे
तत्पूर्वी, आजच्या दसरा मेळाव्याच्या सभेत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्यातल्या काही भागांतील दुष्काळाची परिस्थिती, राज्यातील मराठा आरक्षण, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न यांसारखे अनेक मुद्दे उद्धव ठाकरे आपल्या भाषणात येऊ शकतात. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला होता, त्यावरुन उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेण्याची शक्यता आहे.
सुशीलकुमार शिंदेंची निवृत्तीची घोषणा, लोकसभेचा उमेदवार जाहीर
तर दुसरीकडे, दसरा मेळाव्याच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावर टीका केली आहे. ठाकरे गटाचा हा दसरा मेळवा नाही, तर हा शिमगा मेळावा असल्याचे ते म्हणाले आहेत. दरम्यान, शिंदे गटाचा हा दुसरा मेळावा आहे. मात्र, धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षाचे नाव मिळाल्यानंतरचा शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. या मेळाव्यातील भाषणात एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाकडून करण्यात येणाऱ्या गद्दाराच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. यासोबतच एकनाथ शिंदे हे आपल्या भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा, मराठा आरक्षण तसेच राज्य आणि केंद्र सरकारने केलेली विकासकामे याविषयी बोलण्याची शक्यता आहे.
One Comment on “मुंबईत ठाकरे आणि शिंदे यांचा दसरा मेळावा”