बारामती, 9 जानेवारीः बारामती तालुक्यातील पणदरे गावातील पंधरखिंड येथील बारामती- निरा रोडवर आज, 9 जानेवारी 2022 रोजी सकाळीच्या सुमारास डंपरचा अपघात होऊन तो पलटी झाला आहे. या भीषण अपघातात डंपरचा वाहन चालक गंभीररीत्या जखमी झाला आहे. सध्या वाहन चालकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
दरम्यान, बारामती येथील ऊस कारखान्याची मळीची वाहतूक करताना डंपर आज, सोमवारी सकाळी पलटी झाला. मळीचे वजन जास्त असल्यामुळे डंपर पडल्याचे बोलले जात आहे.
ठेकेदाराच्या हलगर्जीपणाने मोरगांव पळशी रोड बनला धोकादायक
या घटनेनंतर पुन्हा एकदा बारामती परिवहन अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बारामती येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचे तालुक्यात सुरु असलेली जड वाहतुकीत काही आर्थिक हित संबंध तर दडले नाहीत ना? अशी चर्चा बारामतीकरांमध्ये सध्या सुरु आहे. पैशांसाठी तालुक्यात ओव्हरलोड वाहतूक सुरु असल्याचेही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
मुढाळे गावात भारतीय पत्रकार संघाची मासिक बैठक संपन्न
आता जड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार का? आरटीओ कार्यालय अजून किती जीवाशी खेळणार आहे? मानव जीव पैशांपेक्षा स्वस्त झालाय का? पैसे भेटले की आपले कर्तव्य विसरून जाऊन अशा ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई करणार का? का नेहमीप्रमाणे गप्प बसणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे परिवहन अधिकारी देणार का? असा सवाल या निमित्ताने सर्वसामान्य बारामतीकरांना पडला आहे.
One Comment on “बारामतीत डंपरचा अपघात; आरटीओकडून अजूनही जीवांशी खेळ सुरुच!”