लहान मुले इतक्या रात्री एकटेच का बसलेत म्हणून सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (पप्पू) सोनवणे, मोईन बागवान, सूरज अहिवळे, गणेश अटपडकर आणि निहाल देवकाते यांना आढळली. त्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांबद्दल विचारले असता ती मुले पारधी समाजाची असल्याचे समजले. दरम्यान, त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी दशरत कोळेकर यांना फोन केला होता. कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी कोळेकर आणि पोलीस मित्र नाळे यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोहचले.
कोळेकर आणि पोलीस मित्र नाळे यांनी दोन मुलांबाबत आसपास शोधाशोध घेतले असता त्या मुलांची आई काही अंतरावर सापडली. मुलांना त्यांच्या आईकडे सुखरुप ताब्यात देऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पोलीस कर्मचारी कोळेकर आणि पोलीस मित्र नाळे यांचे आभार मानले.