बारामती, 27 एप्रिलः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील प्रशासकीय भवनात विविध प्रशासकीय विभाग आहेत. यामुळे बारामती शहरासह तालुक्यातून या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती ही आपापल्या कामानिमित्त येत असते. मात्र आज, 27 एप्रिल 2023 रोजी प्रशासकीय भवनातील तहसिल कार्यालयात सर्वसामान्य नागरीकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.
तहसिल कार्यालयात आज, दिवसभर स्लो (धिम्या गतीने) इंटरनेट असल्याने नागरीकांना कागदपत्रांसाठी दिवसभर ताठकळत बसावे लागले. तहसिल कार्यालयातील इंटरनेट सुविधा धिम्या गतीने चालत असल्याने नागरीकांना प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागला. उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र यासह इतर कागदपत्रांसाठी आलेल्या अनेक नागरीकांना तर रिकाम्या हाती घर परतावे लागले. यासह वयोवृद्ध, अपंग, महिला आदींनाही आज, गुरुवारी नाहक त्रास झाला.
One Comment on “तहसिल कार्यालयातील इंटरनेटमुळे सर्वसामान्यांचे हाल”