मुंबई, 09 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील अनेक भागांत आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आजच्या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे. या पावसाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तत्पूर्वी, मुसळधार पाऊस झाल्यामुळे मुंबईतील सर्व शाळा आणि कॉलेज यांना काल देखील सुट्टी देण्यात आली होती.
https://x.com/ANI/status/1810364016172347614?s=19
https://x.com/ANI/status/1810364843918283081?s=19
https://x.com/ANI/status/1810363630107636215?s=19
https://x.com/ANI/status/1810332300384641299?s=19
https://x.com/ANI/status/1810487208987832641?s=19
परीक्षा पुढे ढकलल्या
राज्यात बहुतांश भागात सध्या पावसाने विश्रांती घेतली. तसेच अनेक भागांत आज पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु, हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांना आज देखील मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांचा नवीन तारखा लवकरच जाहीर होतील, असे मुंबई विद्यापीठाने सांगितले आहे.
सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट
याशिवाय, हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात आज अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, सातारा जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका, असे आवाहन देखील सातारा जिल्हा प्रशासनाने केले आहे.