औरंगाबादमध्ये 500 कोटींचे ड्रग्ज जप्त

औरंगाबाद, 23 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) औरंगाबाद येथील एका कारखान्यातून तब्बल 500 कोटी रुपयांचे कोकेन, केटामाईन आणि एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई अहमदाबाद क्राईम ब्रँचने केली आहे. याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आले आहे. तत्पूर्वी, अहमदाबाद क्राईम ब्रँचला महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील एका कारखान्यात कोकेन, केटामाईन आणि एमडी ड्रग्ज बनवत असल्याची माहिती मिळाली होती.

मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करु नये- एकनाथ शिंदे

त्या माहितीच्या आधारे अहमदाबाद क्राईम ब्रँच आणि डीआरआयने सापळा रचला आणि या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडले. या कारवाईत 200 कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि 300 कोटी रुपयांचा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 23 किलो कोकेन, 17 किलो एमडी ड्रग्ज आणि 4.5 किलो केटामाईन यांचा समावेश आहे.

जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

यावेळी चौकशी केल्यानंतर 3 जणांना अटक करण्यात आली. सध्या त्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, या कंपनीत तयार करण्यात येत असलेले ड्रग्ज देशभरात पुरवण्यात येत असल्याची माहिती यावेळी क्राईम ब्रँचने दिली. तर इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

One Comment on “औरंगाबादमध्ये 500 कोटींचे ड्रग्ज जप्त”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *