अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश; परराज्यातील दोघांना अटक

मुंबई, 30 मे: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील बोरीवली पुर्व या भागात हेरॅाईन ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला आहे. यावेळी पोलिसांनी या आरोपींकडून 280 ग्रॅम हेरॅाईन हा अंमली पदार्थ जप्त केला. त्याची किंमत सुमारे 1.20 कोटी रुपये इतकी आहे. अटक केल्यानंतर या दोन्ही आरोपींना मुंबईच्या कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने दोन्ही आरोपींना येत्या 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलीस करीत आहेत.

https://twitter.com/MumbaiPolice/status/1796089756054618344?s=19

https://twitter.com/airnews_pune/status/1796128853485932694?s=19

दोन्ही आरोपी परराज्यातील

तत्पूर्वी, अटक केलेले हे दोन आरोपी मुळचे उत्तराखंड राज्यातील असुन ते मुंबईत अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी आले होते. मुंबई पोलिसांच्या कांदीवली युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाला झारखंडमधून काही लोक बोरिवली परिसरात हेरॉईनची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती कळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून याठिकाणी धाड टाकली आणि याप्रकरणात दोघांना अटक केली. सध्या या दोन्ही आरोपींची सखोल मुंबई पोलीस करीत आहेत.

पोलिसांकडून विशेष मोहिम

दरम्यान, अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार, गेल्या काही काळात मुंबई आणि मुंबई परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अनेक आरोपींना अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अटक केली आहे. तसेच अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या माध्यमातून मुंबई शहर आणि परिसरात अमली पदार्थांच्या संदर्भात सातत्याने जनजागृती मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत नागरिकांना अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम बाबत माहिती देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *