द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकावला

नवी दिल्ली, 26 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) देशभरात 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी राष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली दिल्लीतील कर्तव्य पथावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीत झाले आणि पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी ध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रपतींच्या परवानगीने याठिकाणी परेड सुरू करण्यात आली.

https://x.com/ANI/status/1750748000534827461?s=20

सोहळ्याला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित

या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, उपराष्ट्रपती जगदीप धनखर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी स्वदेशी तोफा प्रणाली 105-मिमी इंडियन फील्ड गनसह 21 तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर 105 हेलिकॉप्टर युनिटच्या चार हेलिकॉप्टरने ड्युटी मार्गावर उपस्थित मान्यवरांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

पारंपारिक वाद्यांनी परेडला सुरूवात

यावेळी 100 महिला वादकांनी शंख, ढोल आणि इतर पारंपारिक वाद्ये वाजवून परेडला सुरूवात केली. यावेळी 100 महिलांनी पारंपरिक वेशभूषेत लोकनृत्य सादर केले. यावेळी हवाई दलाच्या 51 विमानांनी फ्लायपास्टमध्ये भाग घेतला. यामध्ये 29 लढाऊ विमाने, 7 वाहतूक विमाने, 9 हेलिकॉप्टर आणि एका हेरिटेज विमानांचा समावेश होता. तर फ्रेंच लष्कराच्या राफेलनेही यंदा प्रथमच फ्लायपास्टमध्ये भाग घेतला. तसेच दिल्ली पोलिसांच्या सर्व-महिला बँडने प्रथमच या परेडमध्ये भाग घेतला. या परेडचे नेतृत्व बँड मास्टर सब इन्स्पेक्टर रुयांगुनूओ केन्से यांनी केले. यावेळी सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवेच्या महिला तुकडीने प्रथमच संचलन केले. त्याचे नेतृत्व मेजर सृष्टी खुल्लर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *