बारामती नगर परिषदेचा प्रारूप आराखडा वादाच्या भोवऱ्यात

बारामती, 25 मेः बारामती नगरपरिषद सर्वत्र निवडणूक 2022 प्रभाग रचना सावळागोंधळ जिल्हा अधिकाऱ्यांसमोर सुनावणीदरम्यान उघड केल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. नगरपालिका आराखड्यावर हरकती व सुनावणी दरम्यान दिनांक 22 मे 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये पार पडले.

सदर सुनावणीमध्ये बारामती नगरपालिकेमधील प्रभाग क्र. 18 व 19 मध्ये प्रभाग रचना नियमावलीची पायमल्ली झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये लोह मार्ग, रस्ता, फ्लाईओवर, दळणवळण लक्षात न घेता प्रभाग रचना निर्मिती करण्यात आली. तसेच प्रभाग 19 ची पश्चिम दिशा कऱ्हा नदीच्या पलीकडे जाऊन पंचशील नगर असे विभाजन करण्यात आले आहेत. मात्र यात पुणे- बारामती रस्ता दर्शवला नाही. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची विभाजन करताना सदर विभाजन कसे केले, या याबाबत नगरपरिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे खोटी माहिती दिल्याचे निर्दशनास आणून दिले.

सदर प्रारूप आराखडा हा राजकीय दबावाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोयीचा केल्याची चर्चा राजकीय कार्यकर्ते करत आहेत. राष्ट्रवादीमध्ये अनेक असंतोषी कार्यकर्त्यांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी प्रभाग रचना केल्याचे बोलले जात आहे. सदर प्रभाग रचनांच्या हरकतींबाबत अभिजीत कांबळे, सचिन साबळे, सम्राट गायकवाड, अक्षय गायकवाड, शिलभद्र भोसले यांच्या वतीने अ‍ॅड. राम सुर्यवंशी व अ‍ॅड. रोहन कांबळे यांनी बाजू मांडली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा करत सार्वजनिक हिताच्या न्याय होईल, अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र अनुसूचित जातीचे चिटणीस यशपाल भोसले यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *