डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल

पुणे, 14 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यासंदर्भात पुणे शहर वाहतूक पोलिसांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये पुणे शहरातील पर्यायी वाहतूक व्यवस्थेची माहिती देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती असल्यामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात मिरवणूका काढण्यात येत असतात. त्यामुळे त्या ठिकाणच्या रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांची खूप मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर, सदर ठिकाणांवर वाहन चालकांची गैरसोय होऊ नये, तसेच वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे व्हावी यासाठी पुणे शहरातील पुणे स्टेशन, अरोरा टॉवर कॅम्प, विश्रांतवाडी व दांडेकर पुल या परिसरातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.

वाहतूक पोलिसांचे आदेश

वाहतूक व्यवस्थेतील बदल हे दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते गर्दी संपेपर्यंत तात्पुरते अंमलात राहतील. तर फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांसारख्या वाहनांना या वाहतूक नियमातून सुट देण्यात आली असल्याची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.



* शाहिर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक शाहिर अमर शेख चौकातून वळविण्यात येत आहे.

* पर्यायी मार्ग:- शाहिर अमर चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहने आरटीओ चौक – जहांगीर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

* जीपीओ चौकातून बोल्हाई चौकाकडे जाणारी वाहतूक जीपीओ चौकातून वळविण्यात येत आहे.

* पर्यायी मार्ग:- जीपीओ चौकातून बोल्हाई, मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक – नेहरू मेमोरियल चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.

* पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक पुणे स्टेशन चौकातून वळविण्यात येणार आहे.

* पर्यायी मार्ग:- अलंकार चौक मार्गे इच्छितस्थळी.
* नरपतगिरी चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक नरपतगिरी चौकातून वळविण्यात येत आहे.

* पर्यायी मार्ग:- नरपतगिरी चौक 15 ऑगस्ट चौक कमला नेहरू हॉस्पिटल, पवळे चौक, कुंभारवेस चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

* बॅनर्जी चौकाकडून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक बॅनर्जी चौकातून वळविण्यात येत आहे.

* पर्यायी मार्ग:- बॅनर्जी चौकाकडून पॉवर हाऊस चौक, नरपतगिरी चौक, 15 ऑगस्ट चौक, कमला नेहरू हॉस्पिटल, पवळे चौक, कुंभारवेस चौकातून इच्छितस्थळी जातील.

* ससुन हॉस्पिटल येथील अत्यावश्यक रुग्णांसाठी मार्ग ससुन हॉस्पिटल येथील डेड हाऊस शेजारील गेटने प्रवेश देण्यात येत आहे.

* मालधक्का चौक ते बोल्हाई चौक ते पुणे स्टेशन, बोल्हाई चौक ते साधु वासवानी चौक, बोल्हाई चौक ते जी.पी.ओ., बोल्हाई चौक ते नरपतगीर चौक, फोटोझिंको प्रेस उपरस्ता व बोल्हाई चौक ते डॉ बॅनर्जी चौक या रस्त्यांवर अत्यावश्यक सेवेखेरीज सर्व प्रकारची वाहनांना नो-पार्किंग करण्यात येत आहे.

* जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींच्या वाहनांकरीता आर.टी.ओ. शेजारी एस.एस.पी.एम.एस. मैदान (दुचाकी व चारचाकी वाहने), पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ (दुचाकी व चारचाकी वाहने) व ससून कॉलनी येथे (दुचाकी वाहने) अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, अनुयायींनी आपली वाहने सदर पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *