बारामती, 22 एप्रिलः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त बारामती शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर 14 ते 21 एप्रिल दरम्यान विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक 2022 (बारामती) स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धा टॅलेंट दिखाओ लेदर बॉल क्रिकेट टुर्नमेंटच्या ओपन खुल्या गटात पार पडल्या. या स्पर्धेत श्री स्वामी समर्थ क्रिकेट अकॅडमीने प्रथम क्रमांक पटकविला. तर स्वराज्य फौंडेशन ACC बारामती या संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागेल. भाजपचे महाराष्ट्र राज्य युवक सदस्य ॲड. आकाश दामोदरे यांच्याकडून श्री स्वामी समर्थ क्रिकेट अकॅडमीला 8000 रुपये आणि सन्मान चिन्ह देण्यात आले. तसेच स्वराज्य फौंडेशन ACC बारामती या संघाला शेर सुहास मित्र मंडळाचे ॲड. सुशिल अहिवळे यांच्याकडून 4000 रुपये आणि सन्मान चिन्ह देण्यात आले.
सदर स्पर्धेचे आयोजन आमराई बॉईज क्रीडा प्रतिष्ठाण, बारामती यांच्या वतीने करण्यात आले. या स्पर्धेत मॅन ऑफ दि सिरीजची उत्कृष्ट ट्रॉफी सुरज जाधव यांच्याकडून, बेस्ट बॅट्समनची उत्कृष्ट ट्रॉफी इम्रान बब्बी बागवान, बेस्ट गोलंदाजची उत्कृष्ट ट्रॉफी स्वराज वाबळे, सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी K ग्रुप प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष चारुदत्तभाऊ काळे यांच्याकडून देण्यात आले. तसेच या स्पर्धेतील सर्व संघांचे किट यशवंत खेडकर, देवा चौधर, पप्पू जगताप, डीजी शिंदे, मयूर ढवाण पाटील, अभिजीत काळे, रविंद्र (पप्पू) सोनवणे, CRICFIT SPORTS च्या वतीने देण्यात आले. या स्पर्धेत टीम संघमालक सुमित यादव, राहुल जगताप, योगेश खरात, शिंदे सर, तात्या माने, BCC 11, जयदीप रसाळे, नाना सातव यांचे संघ खेळले.