बारामती, 5 ऑगस्टः बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद कॉलेजमधील कला शाखेची विद्यार्थिनी रितिका गणेश शिंदे हिला एच.एस.सी. बोर्ड परीक्षा 2019 मध्ये चांगले गुण मिळाले होते. या मिळालेल्या गुणांची दखल राष्ट्रीय सामाजिक न्याय व विकास मंत्रालयाने घेतली आहे.
रितिका शिंदेला मिळालेल्या गुणांसाठी राष्ट्रीय सामाजिक न्याय व विकास मंत्रालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिकसह रोख 20 हजार जाहीर करण्यात आले आहे. पारितोषिक जाहीर होताच रितिका हिचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना संसद महारत्न व संसद विशिष्टरत्न पुरस्कार
यानिमित्त तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांच्या हस्ते रितिका शिंदे हिचा कॉलेजतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच रितिका हिचा कनिष्ठ विभागामधील कला शाखेतील सर्व प्राध्यापकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.