डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जळोचीमध्ये घरा-घरात संविधान उपक्रम

बारामती, 16 एप्रिलः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता बारामतीमधील जळोची येथे प्रतिमापूजन आणि पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जळोची येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार स्वप्निल कांबळे, महेंद्र गोरे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. डॉ. बाबासाहेब यांच्या जयंत्तीनिमित्त संविधानाचा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी जळोची येथे घरा-घरात संविधान उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून संविधानाची उद्देशपत्रिका वाटप करण्यात आल्या.

जयंतीनिमित्त जळोची परिसरातील विद्यार्थांना शालेय साहित्य तसेच एम.पी.एस.सी पुस्तके गरजू विद्यार्थांना वाटप करण्यात आली.

बारामतीमधील प्रसिद्ध हॉटेलवर कारवाईचे आदेश

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सबंध भारत देशातील नागरीकांच्या कल्याणासाठी आहे. तसेच संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्व नागरीकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय बहाल केले आहे. याची जाणीव सर्वांनी ठेवून महामानवांचा आदर्श अंगीकारावा, असे आवाहन स्वप्निल कांबळे यांनी केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 3000 कोल्डड्रिंक्स ज्यूसचे वाटप


यावेळी किशोर मासाळ, प्रताप पागळे, अतुल बालगुडे, दत्तात्रय माने, अर्जुन पागळे, श्रीरंग जमदाडे, शैलेश बगाडे, गणेश काजळे, मानसिंग सुळ, गणेश सातकर, प्रमोद ढवाण, गणेश पागळे, धनंजय जमदाडे, तानाजी सातकर, नवनाथ मलगुंडे, शेखर सातकर, किरण शेंडगे, निलेश सातकर, उमेश कुदळे, गणेश मासाळ, महेश शिंदे, बाळू बनकर, मोहन कांबळे, शुभम कांबळे, चेतन कांबळे, विकी कांबळे, विशाल कांबळे, आदर्श कांबळे, संघर्ष कांबळे, संदिप भोसले तसेच जळोची परिसरातील नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचालन संचालन सलीम सय्यद यांनी केले.

One Comment on “डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जळोचीमध्ये घरा-घरात संविधान उपक्रम”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *