अधिवेशनात पराभवाचा राग धरू नका, मोदींचा विरोधकांना टोला

नवी दिल्ली, 04 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. त्याआधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. “देशाने नकारात्मकता नाकारली आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आम्ही आमच्या विरोधी पक्षातील सहकार्‍यांशी चर्चा करत असतो. आम्ही नेहमी सर्वांच्या सहकार्याची प्रार्थना आणि विनंती करत असतो. यावेळीही देखील आम्ही विरोधी पक्षासोबत यासंदर्भात चर्चा केली आहे. मी आमच्या सर्व खासदारांनाही विनंती करतो की लोकशाहीचे हे मंदिर सार्वजनिक आकांक्षेसाठी आणि विकसित भारताचा पाया मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे.” असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

पाचव्या टी-20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

“देशात सध्या थंडी उशीरा पडत आहे. त्याचवेळी मात्र राजकीय उष्णता वेगाने वाढत आहे. काल चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आले. हे निकाल अतिशय उत्साहवर्धक आहेत. हे निकाल जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहेत त्यांच्यासाठी उत्साहवर्धक आहेत. तसेच जो देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी समर्पित आहे. विशेषतः देशातील महिला, युवक, शेतकरी आणि गरीब जनता त्यांच्यासाठी हे निकाल उत्साहवर्धक आहेत.” असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा आज विजय झाला – नरेंद्र मोदी

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला. “मी नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालांच्या आधारे बोललो तर विरोधी पक्षात बसलेल्या आमच्या सहकाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या अधिवेशनात पराभवाचा राग काढण्याऐवजी तुम्ही सकारात्मकतेने सभागृहात यावे. तुम्ही या पराभवातून धडा घ्या आणि गेल्या 9 वर्षातील नकारात्मकतेची प्रवृत्ती मागे टाका. त्यामुळे देश तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला.

One Comment on “अधिवेशनात पराभवाचा राग धरू नका, मोदींचा विरोधकांना टोला”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *