त्या अफवांवर विश्वास ठेवू नका- बारामती शहर पोलीस स्टेशन

बारामती, 24 सप्टेंबरः हल्ली सोशल मीडियावर काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुलाला अपहरण करतानाच्या घटना दिसत आहेत. ते व्हिडीओ स्थानिक सोशल मीडिया ग्रुपवर मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड करण्यात येत आहेत. सदरचे व्हिडीओ आणि फोटो आपल्या भागातीलच असल्याबाबतचे कॅप्शन देऊन ते स्थानिक लोकांमध्ये पसरवले जात आहे. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये घबराहट पसरत आहे.

या प्रकारे लूटपाट करणारी किंवा लहान मुलांना अपहरण करणारी कोणतीही टोळी बारामती शहरासह तालुक्यात आलेली नाही. अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रकारचा व्हिडीओ मेसेज फोटो जर आपल्याला आपल्या स्थानिक भागाचे कॅप्शन देऊन फॉरवर्ड करून आपल्याकडे आला तर आपण तात्काळ पोलीस ठाण्याला कळवावे किंवा आपण डायल 112 सुद्धा कळवावे.

अनाधिकृत प्लॉटिंगला मोठा दणका

आपल्या गावामध्ये कुणी अनोळखी इसम किंवा लोक दिसून आल्यास आपण सदर बाब तात्काळ पोलीस पाटलाला कळवावी किंवा डायल 112 ला कळवावी किंवा पोलीस ठाण्याची संपर्क करावा. सदर व्यक्तींना कोणत्याही प्रकारे विना चौकशी मारहाण करू नये, असे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे. तसेच त्यांनी सीपी पुणे सिटीने ट्विटरवर ट्वीटही केलेलं ट्वीट भारतीय नायकसोबत शेअर केले आहे.

बारामती शहरासह तालुक्यात एखादी व्यक्ती किंवा टोळी संशयास्पद आढळून आल्यास त्यांना विना चौकशी मारहाण करणे टाळावेत, कारण यातून सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा मेसेज बाबत आपण स्थानिक पोलीस ठाण्याकडून खातरजमा करून घ्यावी, तो तुमचा अधिकार आहे. परंतु अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. बारामतीमध्ये कोणत्याही लहान मुलाला अपहरण केले बाबतची नोंद अद्याप पर्यंत झालेली नसल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी भारतीय नायकशी बोलताना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *