पुणे जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व! पहा कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार विजयी?

पुणे, 24 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यात एकूण 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात महायुतीचे पूर्णपणे वर्चस्व असल्याचे दिसून आले. यामध्ये पुणे जिल्ह्यात भाजपने सर्वाधिक 9 जागा जिंकल्या. त्यापाठोपाठ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 8 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक जागा जिंकली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने एक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एका जागेवर विजय मिळवला. तसेच पुणे जिल्ह्यात अपक्ष उमेदवाराने एक जागा जिंकली.

पुणे जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार विजयी?

1) जुन्नर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी 6 हजार 664 मतांनी विजय मिळवला आहे.
2) आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी 1 हजार 523 मतांनी विजय मिळवला आहे.
3) खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे यांनी 51 हजार 743 मतांनी विजय मिळवला आहे.
4) शिरूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माऊली कटके यांनी 74 हजार 550 मतांनी विजय मिळवला आहे.
5) दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राहुल कुल यांनी 13 हजार 889 मतांनी विजय मिळवला आहे.



6) इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी 19 हजार 410 मतांनी विजय मिळवला आहे.
7) बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अजित पवार यांनी 1 लाख 899 मतांनी विजय मिळवला आहे.
8) पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी 24 हजार 188 मतांनी विजय मिळवला आहे.
9) भोर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी 19 हजार 638 मतांनी विजय मिळवला आहे.
10) मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील शेळके यांनी 1 लाख 08 हजार 565 मतांनी विजय मिळवला आहे.

11) चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांनी 1 लाख 03 हजार 865 मतांनी विजय मिळवला आहे.
12) पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी 36 हजार 664 मतांनी विजय मिळवला आहे.
13) भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांनी 63 हजार 765 मतांनी विजय मिळवला आहे.
14) वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी 4 हजार 710 मतांनी विजय मिळवला आहे.
15) शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी विजय मिळवला आहे.

16) कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी 1 लाख 12 हजार 041 मतांनी विजय मिळवला आहे.
17) खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी 52 हजार 322 मतांनी विजय मिळवला आहे.
18) पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी 54 हजार 660 मतांनी विजय मिळवला आहे.
19) हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार चेतन तुपे यांनी 7 हजार 122 मतांनी विजय मिळवला आहे.
20) पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुनील कांबळे यांनी 10 हजार 320 मतांनी विजय मिळवला आहे.
21) कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी 19 हजार 423 मतांनी विजय मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *