घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळ्या बारामतीत सक्रिय? महसूल व पोलिस प्रशासन अनभिज्ञ

बारामती, 12 मेः बारामती तालुक्यातील सांगवी या गावात काही दिवसांपुर्वी घरगुती गॅस सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला. घरगुती सिलेंडर गॅसद्वारे व्यवसायिक सिलेंडर भरत असताना स्फोट झाल्याने ही चोरी उघडकीस आली. परंतु स्फोटक नियंत्रण बाळगणे व हाताळणे अंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर एकत्र कसे आले? याचा आधीच शोधही लागला नाही.

गोरगरिबांना मोफत मिळालेले सिलेंडर महाग झाल्याने तसेच सबसिडी बंद झाल्याने जास्त भावाने सिलेंडर काळ्या बाजारात कंपनीमार्फत विकले जातात. हे सिलेंडर पलटी करून व्यवसायिक श्रीमंत बनले आहेत. अनेक वडापावच्या गाड्या वरती, चायनीज स्टॉल वरती, हॉटेल वरती, चहाच्या गाड्यांवर घरगुती सिलेंडर सर्रासपणे वापरले जात आहेत. त्यांच्या विरोधात कधीही सुनियोजित मोहीम आखली जात नाही. यामुळे बारामती शहरासह तालुक्यात एजंट मार्फत हप्ते गोळा करणारे एक साखळी तयार झाली आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांना शासन अभय तर देत नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *