केळ हे फळ खूप पौष्टीक असून ऊर्जेचा एक उत्तम स्त्रोतही आहे. केळी खाल्ल्याने ते आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते.
– ग्लुकोजचे प्रमाण केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने ते शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. तसेच केळीमध्ये 75 टक्के पाण्यासह फॉस्फरस, तांबे, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियम आढळतात.
– केळ्यात असणाऱ्या मॅग्नेशियम, तांबे, लोह हे रक्त निर्मितीसाठी खूप फायदेशीर असतात. तसेच केळ्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
– बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास अनेक जाणकार व्यक्ती केळी खाण्याचे सल्ले देत असतात. तसेत केळीमुळे आतड्यांचे कार्य सुधारते.
– जिभेवर फोड आल्यास केळी गाईच्या दह्यासोबत खाल्ल्यास खूप उपयुक्त असते.
– केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
– केळी खाल्ल्याने डिप्रेशनची समस्याही दूर होते.
– केळ्यामध्ये व्हिटामिन बी मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रक्तामधील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते.