बारामती, 5 डिसेंबरः बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथे गेले 50 ते 60 वर्षांपासून गायरान गटांमध्ये वास्तव्य करत आहोत. याचा विचार करून आमच्यावरही अन्याय होणार नाही, याची दखल ग्रामपंचायतीने घ्यावी, अशी मागणी वडगांव निंबाळकर येथील गायरानातील अतिक्रमणधारकांनी नुकतीच केली आहे.
वडगांव निंबाळकर येथे गायरान गटामध्ये राहत असणाऱ्या लोकांना वडगांव निंबाळकर ग्रामपंचायतच्या वतीने अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावल्या होत्या. या नोटिसांचा खुलासा देण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाकडून दहा दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर येथील महिला व ग्रामस्थ यांनी वडगांव निंबाळकर ग्रामपंचायतमध्ये निवेदन देत कारवाई न करण्याची मागणी केली. उपसरपंच संगीता शहा, सदस्य अजित भोसले महिला सदस्या प्रेमलता रांगोळी यांनी हे निवेदन स्वीकारले.
माळेगाव कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर!
तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची खबरदारी ग्रामपंचायत कार्यालय घेईल, असे आश्वासन वडगांव निंबाळकर ग्रामपंचायतच्या उपसरपंच संगीता शहा यांनी दिले.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष पै. नानासाहेब मदने, बहुजन हक्क परिषदेचे तालुका युवक अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी अतिक्रमणधारकांना जाहीर पाठिंबा दिला. या प्रसंगी लता खंडाळे, कल्पना धुमाळ, अलका बागडे, लता चव्हाण, प्रभावती रांगोळी, मंदा पवार, सफिया आतार, शबाना बागवान, कल्पना प्रसाद, मंदा खोडके, करिष्मा बागवान, प्रफुल्ल शेंडे, किसन ननवरे, नितीन शिंदे, मधुकर शिंदे, तुषार चव्हाण, बजरंग जाधव, रुपेश रांगोळी, सलमान आतार, सनी प्रसाद आदी उपस्थित होते.
उद्यापासून माळेगावात विशेष मतदार नोंदणी मोहीम
वडगांव निंबाळकर येथील गायरान गटांमध्ये वास्तव्यात असणाऱ्या लोकांवर अन्याय होणार नाही. ग्रामपंचायत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. या दिलेल्या निवेदनाचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करून शासन दरबारी याबाबत योग्य ती भूमिका घेऊ, कोणावरही अन्याय होणार नाही, असे ग्रामपंचायत सदस्य अजित भोसले यांनी अतिक्रमणधारकांना आश्वासन दिले.
One Comment on “गायरान गटातील अतिक्रमणावर कारवाई करू नका”